Our Projects

Shri. Ambeshwar M. Vidyalaya ,Amba

हे विद्यालय १२/११/१९८१ मध्ये स्थापन झाले. इयत्ता पाचवी ते दहावी चे वर्ग आहेत. सहावी, सातवी, आठवी, नववी प्रत्येकी दोन तुकड्या आहेत.विद्यालयात 190 मुली, 195 मुले शिक्षण घेतात. शाळेत 11 शिक्षक आणि एक मुख्याध्यापक असे 12 शिक्षक कार्यरत आहेत.

* दरवर्षी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यालयाचा सहभाग असतो. * जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्राप्त विद्यालय. * 2019 मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन चॅम्पियनशिप चषक प्राप्त विद्यालय. * विज्ञान शिक्षिका म्हणून

एम.एस. पाटील मॅडम, पी. एस. शेडे मॅडम यांच्याकडे जबाबदारी आहे. * सहाय्यक शिक्षक एस.एस. गद्रे आणि दैनिक ऍग्रोवनचे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांनी पुढाकार घेऊन अजय वालगुडे सरांचे मार्गदर्शन आणि मदतीने जानेवारी 2022 मध्ये शाळेत तुरीय लॅब सुरू केली. शाळेचे मुख्याध्यापक ए. बी. मोरे यांचे या उपक्रमास चांगले सहकार्य लाभले आहे. * शालेय शिक्षणामध्ये विज्ञान विषय शिकवताना तुरीय लॅब चा चांगला उपयोग होत आहे. * तुरीय लॅब माध्यमातून अमित गद्रे यांच्या शेतीमध्ये महिन्यातून एकदा शिवार फेरी असते. यामध्ये विद्यार्थी शेतीच्या पद्धती, विविध प्रकारची फळझाडे, देशी गोपालन, गांडूळखत निर्मिती, अळंबी उत्पादन आदी विषयावर माहिती घेतात. * तुरीय लॅब च्या माध्यमातून गावातील महिलांना एकत्र करून गांडूळखत उत्पादन प्रकल्प आणि सोलर डी हायड्रेशन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

Shri. Ambeshwar M. Vidyalaya ,Amba

Shri Ambeshwar Secondary School, Amba, Tal. Shahuwadi, Dist. Kolhapur The school was established on 12/11/1981. It has classes from 5th to 10th standard, with two sections each for 6th, 7th, 8th, and 9th grades.

The school has 190 girl students and 195 boys. A total of 12 teachers are working at the school, including 11 subject teachers and one headmaster. • The school participates in the taluka-level science exhibition every year. • It has received the district-level INSPIRE Award. • In 2019, the school won the championship trophy at the taluka-level science exhibition. • Science teachers Mrs. M. S. Patil and Mrs. P. S. Shede are responsible for science education. • Assistant teacher Mr. S. S. Gadre, along with Agrowon’s Chief Sub-Editor, Mr. Amit Gadre, took the initiative to establish the Turiya Lab in January 2022 under the guidance and support of Mr. Ajay Walgude. The school headmaster, Mr. A. B. More, provided excellent support for this initiative.

• The Turiya Lab is effectively utilized in teaching science subjects as part of school education. • Through the Turiya Lab, a monthly field visit is organized to Mr. Amit Gadre’s farm. During these visits, students learn about farming methods, various types of fruit trees, indigenous cattle rearing, vermicomposting, and mushroom cultivation. • The Turiya Lab has also initiated projects in the village, bringing women together to start a vermicomposting project and a solar dehydration project.