Our Projects
तुरिया विज्ञान प्रयोगशाळा अंतर्गत "Star Gazing" व खगोल अभ्यास उपक्रम
उपक्रमाचा उद्देश: तुरिया विज्ञान प्रयोगशाळा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची गोडी लावण्यासाठी आणि आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी "Star Gazing" व विविध खगोल अभ्यास कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या उपक्रमांचा मुख्य उद्देश मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि खगोलशास्त्राची ओळख करून देणे हा आहे.
उपक्रमाचे स्वरूप: Star Gazing सत्रे: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोऱ्हे बुद्रुक येथे उपलब्ध असलेल्या टेलिस्कोपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्टार गेझिंगचा आनंद दिला जातो. या सत्रांमध्ये मुलांना चंद्र, ग्रह, तारकासमूह, आकाशगंगा इत्यादींचे निरीक्षण करता येते. खगोलशास्त्र कार्यशाळा: खगोलशास्त्राशी संबंधित विविध विषयांवर कार्यशाळा घेतल्या जातात. या कार्यशाळांमध्ये सूर्य आणि त्याच्या प्रणाली, ग्रह-उपग्रह, उल्का पात, ग्रहण इत्यादी विषयांवर माहिती दिली जाते. उपक्रमाचे वैशिष्ट्य:
टेलिस्कोपचा प्रत्यक्ष वापर करून आकाश निरीक्षणाची संधी. मुलांच्या कुतूहलाला चालना देणारे संवादात्मक सत्र. खगोलशास्त्राच्या प्राथमिक संकल्पना सुलभ व सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या जातात. विद्यार्थी आकाशातील बदलती दृश्ये पाहून वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करू लागतात. मार्गदर्शन: या उपक्रमासाठी तज्ज्ञ खगोलशास्त्रज्ञ व शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. यामुळे मुलांना अभ्यास करताना तसेच निरीक्षण करताना संपूर्ण माहिती व योग्य प्रशिक्षण मिळते.
मुलांचा प्रतिसाद: मुलांना आकाश निरीक्षणाचा अनुभव फारच आवडतो. त्यांना प्रत्यक्ष ग्रह-ताऱ्यांचे निरीक्षण करताना मिळणारा आनंद व त्यातून मिळणारे ज्ञान खूप प्रेरणादायक वाटते. आमचे उद्दीष्ट: आमचा उद्देश म्हणजे विज्ञान व खगोलशास्त्र क्षे त्रातील मूलभूत गोष्टी मुलांना समजावून देऊन त्यांच्यात वैज्ञानिक विचारसरणी विकसित करणे. तुरिया विज्ञान प्रयोगशाळा अशा अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सृजनशीलता, निरीक्षण कौशल्य आणि विज्ञानाची ओळख करून देण्यासाठी सतत कार्यरत आहे.
Star Gazing” and Astronomy Initiative by Turiya Science Lab
Objective of the Initiative: Turiya Science Lab organizes “Star Gazing” sessions and various astronomy workshops to spark interest in astronomy among school students and help them experience the beauty of planets and stars in the night sky. The primary goal of this initiative is to develop a scientific mindset and introduce students to the field of astronomy.
Structure of the Initiative: Star Gazing Sessions: • Through the use of telescopes at Zilla Parishad Primary School, Gorhe Budruk, students are given the opportunity to enjoy star gazing. • During these sessions, students observe the Moon, planets, constellations, galaxies, and other celestial objects. Astronomy Workshops: • Workshops on various astronomy topics are conducted. • These workshops cover subjects such as the Sun and its system, planets and satellites, meteor showers, eclipses, and more. Features of the Initiative: • Hands-on experience with telescopes for sky observation. • Interactive sessions designed to nurture students’ curiosity. • Simple and easy-to-understand explanations of basic astronomy concepts. • Students begin to think scientifically while observing the changing scenes in the sky.
Guidance: • Expert astronomers and schoolteachers guide the students during these sessions and workshops. • This ensures that students receive comprehensive knowledge and proper training while learning and observing. Student Response: • Students thoroughly enjoy the experience of sky observation. • They find joy and inspiration in directly observing planets and stars, and the knowledge they gain from it is highly motivating.
Our Aim: Our aim is to help students understand the fundamental concepts of science and astronomy while fostering a scientific outlook. Turiya Science Lab remains dedicated to promoting creativity, observational skills, and scientific awareness among students through innovative initiatives like these.