Our Projects
तुरिया विज्ञान प्रयोगशाळा अंतर्गत "गांडूळखत निर्मिती" उपक्रम
उपक्रमाचा उद्देश: तुरिया विज्ञान प्रयोगशाळा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीत गांडूळखताचे महत्त्व व उपयोग समजावून देण्यासाठी "गांडूळखत निर्मिती" प्रकल्प राबविण्यात येत आहे. पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक संसाधनांचा योग्य उपयोग करण्याची सवय लावणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.े.
उपक्रमाची सुरुवात: प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोऱ्हे बुद्रुक, पुणे येथे हा प्रकल्प सुरू करण्यात आला. उपक्रमाचे स्वरूप: गांडूळखत निर्मिती प्रकल्पाचे टप्पे: पहिला टप्पा: विद्यार्थ्यांनी जवळपास 100 किलो गांडूळखत यशस्वीपणे तयार केले. दुसरा टप्पा: विद्यार्थ्यांनी आणखी 100 किलो गांडूळखत तयार केले आहे. शिकण्याची प्रक्रिया:
मुलांना गांडूळखत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, प्रक्रिया आणि गांडुळांच्या जीवनचक्राची माहिती देण्यात आली. खतनिर्मिती प्रक्रिया कशी पारदर्शक आणि शाश्वत करता येईल, यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. उपक्रमाचे वैशिष्ट्य: सेंद्रिय शेतीचा आधारभूत पाया समजावून देणे. शाळेच्या परिसरात तयार होणाऱ्या जैविक कचऱ्याचा पुनर्वापर. पर्यावरणपूरक दृष्टिकोन विकसित करणे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणे. मार्गदर्शन: श्री. अजय वालगुडे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आणि शाळेतील शिक्षक रजनिकांत मेंढे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
मुलांचा प्रतिसाद: विद्यार्थ्यांनी गांडूळखत निर्मिती प्रक्रियेत विशेष रस घेतला आहे. त्यांनी मोठ्या उत्साहाने प्रक्रिया समजून घेतली आणि यशस्वीपणे खत तयार केले. आमचे उद्दीष्ट: या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून देणे आणि त्यांना पर्यावरणपूरक दृष्टिकोनाची सवय लावणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. तुरिया विज्ञान प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना सर्जनशील, प्रयोगशील आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करत राहील.
Vermicomposting” Initiative by Turiya Science Lab
Objective of the Initiative: Under Turiya Science Lab, the “Vermicomposting” project is being conducted to teach school students the importance and benefits of vermicompost in organic farming. The initiative aims to introduce students to eco-friendly farming techniques and encourage them to utilize natural resources effectively.
Beginning of the Initiative: This project was started on a pilot basis at the Zilla Parishad Primary School, Gorhe Budruk, Pune.
Structure of the Initiative: Stages of the Vermicomposting Project: • First Stage: Students successfully produced 100 kilograms of vermicompost. • Second Stage: An additional 100 kilograms of vermicompost was produced by the students. Learning Process: • Students were taught about the materials, process, and lifecycle of earthworms needed for vermicomposting. • Special guidance was provided on how to make the composting process transparent and sustainable.
Features of the Initiative: • Explaining the fundamental principles of organic farming. • Recycling organic waste generated on school premises. • Developing an eco-friendly mindset. • Providing hands-on learning experiences to students.
Guidance: The project has been successfully implemented under the technical guidance of Mr. Ajay Walgude and the leadership of schoolteacher Mr. Rajnikant Mendhe. Student Response: Students showed great interest in the vermicomposting process. They enthusiastically learned the techniques and successfully produced compost. Our Aim: The goal of this initiative is to help students understand the importance of organic farming and instill in them an eco-friendly perspective. Turiya Science Lab will continue to organize such initiatives to make students more creative, experimental, and environmentally conscious.